पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोविड-१९ : इस्त्रायल पंतप्रधानांची PM मोदींकडे सहकार्याची विनंती

मोदी आणि नेत्यानाहू

कोरोना विषाणूच्या जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संपर्क केला. या दोन नेत्यांनी कोरोनाच्या मुद्यासंदर्भात कोणती पावले उचलणे गरजेचे आहे, याविषयी चर्चा केली. कोरोना विषाणूने डोके वर काढल्यापासून दोन्ही नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत. भारताकडून तांत्रिक सहकार्य मिळावे तसेच कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासंदर्भात मार्गदर्शन व्हावे, यावर इस्त्रायल पतंप्रधानांनी भर दिल्याचे समजते. 

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ४९० वर; ५० रुग्णांना डिस्चार्ज

नेत्यानाहू यांनी यापूर्वी मोदींकडे मास्क आणि इतर आवश्यक मेडिकल सामूग्री भारतातून इस्त्रायलला पाठवण्यासंदर्भात विनंती केली होती. १३ मार्चला भारताने बाहेरील देशातील निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इस्त्रायलमधील निर्यात कायम ठेवण्याबाबत नेत्यानाहू यांनी मोदींना विनंती केली होती.  
आम्ही वेगवेगळ्या राष्ट्रांतून होणाऱ्या पुरवठ्यावर अवलंबून आहोत. याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली असून मोदी माझे चांगले मित्र आहेत, असा उल्लेख नेत्यानाहू यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना केला होता. इस्त्रायलमध्ये आतापर्यंत ७ हजारहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून 38 लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे.

कर्मचारी संघटनेचा भत्ता कपातीला विरोध, दिला मोदींच्या भाषणाचा दाखला

चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. जगाच्या पाठिवर अव्वल असणाऱ्या अमेरिकाही या विषाणूसमोर हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. युरोपातही  या विषाणूने चांगलाच कहर माजवला असून आतापर्यंत सर्वाधिक बळी हे इटलीमध्ये गेले आहेत. यावर कोणतीही लस नसल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या मार्गाने यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु असून जगातील सर्वांनी एकत्र या लढ्याला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.