पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नेहरू स्मारक सोसायटीतून काँग्रेस नेते 'आऊट', अमित शहा 'इन'

नेहरू स्मारक सोसायटी

प्रख्यात नेहरू स्मारक संग्रहालय आणि पुस्तकालय सोसायटीच्या मंडळातून काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश आणि कर्ण सिंह यांना काढून टाकण्यात आले आहे. त्यांच्या जागी या सोसायटीवर टीव्ही पत्रकार रजत शर्मा, प्रख्यात गीतकार प्रसून जोशी आणि राज्यसभा सदस्य स्वामी दासगुप्ता यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. मंगळवारी या संदर्भातील नवे आदेश काढण्यात आले.

दिल्लीत अहमद पटेलांनी घेतली नितीन गडकरींची भेट आणि...

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सोसायटीचे अध्यक्ष आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपाध्यक्ष आहेत. या सोसायटीच्या नियामक मंडळाची फेररचना करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या सोसायटीच्या सदस्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल, पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, व्ही मुरलीधरन, प्रल्हाद सिंह पटेल, विनय सहस्त्रबुद्धे यांचा समावेश आहे.

पाकच्या कुरापती, कर्तारपूर व्हिडिओत खलिस्तानी नेत्यांचे पोस्टर

या सर्व सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत असेल, असे नमूद करण्यात आले आहे.