पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नीरव मोदीच्या रोल्स रॉयस कारची १.७० कोटीत विक्री

नीरव मोदी

भारतीय बँकांना हजारो कोटीचा चुना लावून परदेशात पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदीची लक्झरी कार रोल्स रॉयस घोस्टला १.७० कोटी रुपये तर पोर्शे पनामेराची ६० लाख रुपयांना विक्री झाली. 

PNB घोटाळा: लंडनच्या कोर्टाने नीरव मोदीचा जामीन फेटाळला

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी या दोन्ही कार समवेत ६ कारचा पुन्हा एकदा लिलाव आयोजित केला होता. २५ एप्रिलला झालेल्या लिलावात १२ कार ठेवण्यात आले होते. यातील रोल्स रॉयस घोस्ट १.३३ कोटी आणि पोर्शेला ५४.६० लाखांना विकली गेली होती. पण कमी किंमत आणि इतर चार कारसाठी बोली लावलेल्या ग्राहकांना पैसे जमा न करता आल्यामुळे या कारचा पुन्हा लिलाव करण्यात आला. ईडीने म्हटले की, मागील लिलावात कारला चांगली किंमत आली नव्हती. तसेच सर्वाधिक बोली लावणाऱ्यांना पैसेही जमा करण्यात अपयश आले. 

उच्चभ्रू आरोपींसाठी आर्थर रोड कारागृहात नवी बराक

दुसऱ्यांदा आयोजित करण्यात आलेल्या लिलावात तीन कार या पहिल्यावेळी लावण्यात आलेल्या किंमतीपेक्षा कमी किमतीवर विकली गेली. यामध्ये मर्सिडिज बेंझ जीएल-३५० फक्त ४८ लाखांत विकली गेली. या कारला आधी ५३.७ लाख रुपये बोली लावण्यात आली होती. याच पद्धतीने होंडा ब्रिओला २.३९ लाखात विकली गेली. आधी याची बोली ही ३.९० लाख रुपये लावण्यात आली होती. एक टोयोटो इनोव्हा ८.७० लाख रुपयांना विकली गेली. याला आधी ९.१२ लाख रुपये बोली लावण्यात आली होती. एका कारची विक्री झालेली नाही

कार विक्री करण्याआधी आयकर विभागाने नीरव मोदीच्या पेंटिग्जचा लिलाव केला होता. या लिलावातून ५९.३७ कोटी रुपये मिळाले होते. मार्चमध्ये त्याचा कोट्यवधींचा बंगलाही उद्ध्वस्त करण्यात आला होता.