पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यसभेत एनडीएची स्थिती होणार मजबूत, खासदारांची संख्या वाढणार

राज्यसभा

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) या महिन्याच्या अखेरीस आणखी चार सदस्यांना आपल्यात सामावून घेत राज्यसभेत आपली स्थिती मजबूत करेल. तेलुगू देशम पार्टीचे (टीडीपी) चार आणि भारतीय राष्ट्रीय लोकदलाच्या (आयएनएलडी) एका सदस्याचा समावेश केला जाईल. त्याचबरोबर एनडीएकडे ११५ खासदार होतील.

हे सदस्य बिहार, गुजरात आणि ओडिशातील आहेत. बिहारमध्ये लोक जनशक्ती पार्टीला (लोजपा) जागा मिळेल. गुजरातमध्ये भाजपच्या खात्यात दोन आणि ओडिशात एक जागा मिळेल.

'काँग्रेसच्या सर्वच वरिष्ठ नेत्यांनी राजीनामा द्यावा'

या वरिष्ठ सभागृहात भाजपचे ७५ सदस्य असल्याने तो सर्वांत मोठा पक्ष आहे. काँग्रेसचे ४८ सदस्य असल्याने ते सर्वांत मोठे विरोधी पक्ष आहेत. त्यानंतर समाजवादी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस १३-१३ सदस्यांसह सर्वांत मोठे बिगर काँग्रेस, बिगर भाजप पक्ष आहेत.

२४ जुलैला तामिळनाडूतून पाच जागा रिकाम्या होणार आहेत. सीपीआयचे डी राजा आणि अण्णा द्रमुकचे आर अर्जुन, डॉ आर लक्ष्मणन, डॉ व्ही मैत्रेयन आणि टी रथिनवेल यांचा समावेश आहे.

राज्यसभा पोटनिवडणूक: गुजरातमधील काँग्रेस नेत्यांची याचिका फेटाळली

मोदी सरकार पहिल्या कार्यकाळापेक्षा यावेळी राज्यसभेच्या कामकाजात कमी अडथळे येण्याची अपेक्षा आहे. विधेयकांना मंजुरी देण्यात अडथळे आणून लोकांच्या जनादेशाला दाबले जाऊ नये, असे पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राज्यसभेतील आपल्या भाषणात म्हटले होते. भाजपला बिजू जनता दल (५), वायएसआर काँग्रेस (२) आणि टीआरएस (६ सदस्य) सारख्या पक्षांकडून मुद्द्यांवर आधारित समर्थनाची अपेक्षा आहे.