पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली हिंसाचाराला भाजपच जबाबदार, शरद पवारांचा केंद्र सरकारवर घणाघात

शरद पवार

दिल्ली हिंसाचाराच्या मुद्यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपात आत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही उडी घेतली आहे. दिल्लीतील हिंसाचाराला केंद्रातील भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर भाजप समाजात तेढ निर्माण करत असल्याचे पवारांनी म्हटले आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला.

 

ममता दीदींनी राज्यात दंगल घडवून आणली : अमित शहा

शरद पवार म्हणाले की, मागील काही दिवस दिल्ली धगधगत आहे. केंद्रातील सत्ताधाऱ्यांना दिल्लीत यश मिळाले नाही. त्यामुळेत भाजप दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी केंद्रीय गृहराज्यमंत्री जी कृष्ण रेड्डी यांनी हैदराबादमधील कार्यक्रमात दिल्लीतील हिंसाचारावर भाष्य केले होते. दिल्लीतील हिंसाचारामध्ये अनेक लोकांनी आपला जीव गमावला. अनेकांची घरे जळली. काही राजकीय पक्षांनी अफवा पसरवल्या. मीडिया आणि सोशल मीडियाने दंगली भडकवण्यास आणखी खत पाणी घातला, असा आरोप केला होता. केंद्र सरकार दिल्ली हिंसाचाराला हातभार लावणाऱ्याला कठोर शिक्षा करेल, असेही जी कृष्ण रेड्डी यांनी म्हटले होते.  

दिल्ली : वेगवेगळ्या परिसरात आणखी तीन मृतदेह सापडले

इशान्य दिल्लीमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरुन तापलेल्या आंदोलनाला मागील आठवड्यात हिंसक वळण लागले होते. या हिंसाचारामध्ये गुप्तचर विभागाचा अधिकारी आणि एका पोलिस कर्मचाऱ्यासह ४२ जणांनी आपला जीव गमावला असून ३०० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जाफराबाद, मौजपूर, बाबरपूर, चांदबाग, शिव विहार, भजनपूरा आणि यमुना विहार परिसरात दंगल उसळल्याचे पाहायला मिळाले होते.  

'राममंदिरामुळे लोक मतदान करतील या भ्रमात राहू नका'

शरद पवार यांच्यापूर्वी काँग्रेसनेही भाजपवर निशाणा साधला होता. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील हिंसाचाराची जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती.