पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'राम मंदिर उभारण्यासाठी ट्रस्ट तयार करु शकता तर मशिदीसाठी का नाही?'

शरद पवार

अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ची स्थापना करण्यात आली आहे. या ट्रस्टची बुधवारी दिल्लीमध्ये पहिली बैठक पार पडली. या ट्रस्टवरुनच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला सवाल केला आहे. 'राम मंदिराच्या उभारण्यासाठी ट्रस्ट तयार करु शकता तर मशिदीसाठी का नाही? असा सवाल त्यांनी केला आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

 

औरंगाबादमध्ये भाजपला धक्का; किशनचंद तनवाणी स्वगृही परतले

शरद पवार यांनी असे म्हटले आहे की, 'अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर उभारणीसाठी तुम्ही ट्रस्ट तयार करु शकता, तर मशीद उभारणीसाठी ट्रस्ट का तयार करु शकत नाही?, असा सवाल शरद पवारांनी केला आहे. 'राम मंदिरासाठी ट्रस्ट तयार करुन तुम्ही आर्थिक मदत करत आहेत. मात्र मशीद उभारण्यासाठी सरकार काहीच मदत करत नाही. मशीद उभारण्यासाठी सुद्धा ट्रस्ट तयार करुन आर्थिक मदत केली पाहिजे, असे पवारांनी सांगितले. तसंच, 'देश तर सगळ्यांचा आहे आणि सगळ्यांसाठी आहे.', असे देखील त्यांनी सांगितले. 

अखेर इंदोरीकर महाराजांनी कायदेशीर नोटीसला दिले उत्तर

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ncp chief sharad pawar asks question modi government why do you not constitute trust for masjid