पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लोकसभेत जय श्रीरामच्या घोषणा देणे अयोग्य - नवनीत कौर राणा

नवनीत कौर राणा

लोकसभेत जय श्रीराम घोषणा देणे योग्य नाही. धार्मिक घोषणा देण्याचे हे ठिकाणही नाही. त्यासाठी मंदिरे आहेत, असे अमरावतीतून निवडून गेलेल्या अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांनी म्हटले आहे. त्यांनी या स्वरुपाच्या घोषणांना आक्षेप घेतला असून, संसदेत अशा घोषणा देणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

१७ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सोमवारी नवी दिल्लीत सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सर्व सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली जात आहे. यावेळी सत्ताधारी बाकांवरील सदस्यांकडून शपथ झाल्यानंतर काहीवेळा जय श्रीराम अशा घोषणा देण्यात येत होत्या. त्यावरूनच नवनीत कौर राणा यांनी आक्षेप घेतला. एएनआयने या संदर्भातील ट्विट केले आहे.

 

 

सिद्धिविनायक मंदिर उडवू, प्रेमप्रकरणातून तरुणाची धमकी

पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, अशा स्वरुपाच्या घोषणा देण्याचे हे स्थान नाही. त्यासाठी मंदिरे बांधलेली आहेत. सर्व देव एकसारखेच आहेत. पण एखाद्याला लक्ष्य करणे आणि कोणाचे तरी नाव घेणे हे अत्यंत चुकीचे आहे.

नवनीत कौर राणा पहिल्यांदाच लोकसभेत निवडून गेल्या आहेत. अमरावतीमधील लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे उमेदवार आनंदराव आडसूळ यांचा पराभव केला होता.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Navneet Kaur Rana on slogans of Jai Sri Ram raised in Parliament This is not the right place temples are there for it