पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीने केला मोठा खुलासा

नवज्योतसिंग सिद्धू

माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योतकौर सिद्धू यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्याचवेळी आपण कोणत्याही राजकीय पक्षासोबत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या मी केवळ एक सामाजिक कार्यकर्ता आहे, असे त्यांनी सांगितले.

मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसचे तिकीट किती माहितीये?

नवज्योतकौर सिद्धू यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्या अमृतसर पूर्व मतदारसंघातच काँग्रेस सोडण्याच्या निर्णयाची घोषणा केली. त्याचवेळी नवज्योतसिंग सिद्धूही आता काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा केवळ अफवा असल्याचे त्यांनी सांगितले. जुलै महिन्यात नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाबमधील कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मत्रिमंडळातून काढता पाय घेतला होता. त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. 

'अब की बार शिवसेना १०० पार', संजय राऊत यांचा दावा

२०१७ मध्ये पंजाबमधील निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर आल्यापासून कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात वाद सुरू होते. नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाबच्या उपमुख्यमंत्रीपदी नेमणूक होईल, अशी शक्यता होती. पण त्यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित मंत्रालय देण्यात आले. त्यानंतर त्यांच्या मंत्रालयामध्येही बदल करण्यात आला. तेव्हापासून नवज्योतसिंग सिद्धू नाराज होते. लोकसभा निवडणुकीवेळी या दोघांमधील वाद विकोपाला गेला होता. त्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.