पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नवज्योतसिंग सिद्धू यांनी राहुल गांधींची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण

नवज्योतसिंग सिद्धू यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली

काँग्रेस नेता आणि पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीत आपण राहुल गांधींना पंजाबमधील स्थिती काय आहे, याबद्दल माहिती दिल्याचे नवज्योतसिंग सिद्धू यांनी म्हटले आहे. या भेटीचा फोटो त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वीच पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सिद्धूच्या खात्यांमध्ये बदल केला. त्यानंतर झालेल्या या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी पक्षात पुन्हा सक्रिय

नवज्योतसिंग सिद्धू यांनी भेटीवेळी कोण कोण होते. त्याचा फोटोही हँडलवरून शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि अहमद पटेल दिसताहेत.

गेल्या आठवड्यात सिद्धू यांच्याकडील स्थानिक स्वराज्य संस्था, पर्यटन आणि सांस्कृतिक कामकाज या खात्यांचा कार्यभार काढून घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जास्रोत ही खाती दिली. तेव्हापासून सिद्धू नाराज आहेत. त्यांनी गेल्याच आठवड्यात राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न केला होता. 

आमचा सामना विषाशी, राहुल गांधी यांची मोदींवर टीका

गेल्या गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीला जाण्याऐवजी सिद्धू यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. तेव्हापासून मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि सिद्धू यांच्यामध्ये सगळेकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले होते.