पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदींच्या 'एक देश एक निवडणूक'ला नवीन पटनाईकांचे समर्थन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवीन पटनाईक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक देश एक निवडणूक' ला ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे (बीजद) प्रमुख नवीन पटनाईक यांनी पाठिंबा दिला आहे. आमचा पक्ष एक राष्ट्र एक निवडणूकच्या विचाराचे समर्थन करतो, असे सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री पटनाईक म्हणाले. देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्याचे समर्थन आहे, असे त्यांनी म्हटले. 

बैठकीत त्यांनी संविधानात 'शांती' आणि 'अहिंसा' हा शब्द जोडण्याची सूचना केली आहे. उल्लेखनीय म्हणजे, मोदींनी लोकसभा आणि सर्व विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याबरोबरज महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती आयोजनासह इतर मुद्द्यांवर सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.

लोकसभा निवडणुकीबरोबरच सर्व राज्यातील विधानसभांच्या निवडणुका एकत्र करण्याबरोबरच इतर मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवन परिसरात बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीकडे काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीने पाठ फिरवली होती. दुपारनंतर सुरु झालेल्या बैठकीला एनडीएचा सहयोगी पक्ष शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पक्ष स्थापना दिनामुळे उपस्थितीत राहू शकले नाही.

या बैठकीला मोदींशिवाय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले आणि अपना दलचे अध्यक्ष आशिष पटेल हेही सहभागी झाले होते.

एनडीएत सहभागी नसलेले नवीन पटनाईक, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी, पीपीपीच्या अध्यक्षा महबुबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, भाकपचे सरचिटणीस एस सुधाकर रेड्डी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी हे सहभागी झाले.