पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'... म्हणून ब्राह्मण समाजाने भाजपविरोधात मतदान करावे'

नवीन जयहिंद

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी ब्राह्मण समाजाचा अपमान केला आहे. त्यामुळे आता ब्राह्मण समाजाने भाजप सरकारविरोधात शस्त्रे परजली पाहिजेत, असे वक्तव्य हरियाणातील आम आदमी पक्षाचे अध्यक्ष नवीन जयहिंद यांनी केले आहे. 

राज्यसेवा परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांच्या नियुक्तीला सुरुवात

नवीन जयहिंद यांनी म्हटले आहे की, भाजपला सत्तेबाहेर घालविण्याची वेळ आली आहे. जर भाजपला आपण सगळ्यांनी परत निवडून दिले. तर ते आपलाच गळा धरतील. यासाठी ब्राह्मण समाजातील नेत्यांनी मनोहरलाल खट्टर यांच्याविरोधात आवाज उठविला पाहिजे. पक्षाच्या तिकिटांपेक्षा ब्राह्मण समाजासाठी सन्मान जास्त महत्त्वाचा आहे, हे आम्हाला मनोहरलाल खट्टर यांना सांगायचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

गोवंडीत १२ वर्षाच्या विद्यार्थ्याने केली मुख्याध्यापिकेची हत्या

मनोहरलाल खट्टर हरियाणातील सामाजिक सलोख्याचे संबंध नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्या विरोधकांना संपविण्याचे कारस्थान ते रचत आहेत, असाही आरोप नवीन जयहिंद यांनी केला आहे. आपण लोकशाही देशामध्ये राहतो. आपल्यात वैचारिक मतभेद असू शकतात. पण आपण एकमेकांचे शत्रू नसतो. मनोहरलाल खट्टर यांनी त्यांच्या बोलण्यातून ते त्यांच्या विरोधकांना शत्रूच मानत असल्याचे दाखवून दिले असल्याचे सांगितले.