पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शेतकऱ्यांवर इतके प्रेम होते तर सरकार का नाही बनवले?, नवनीत कौर यांचा शिवसेनेला सवाल

नवनीत कौर राणा

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर ओढावलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेमध्ये आपला मुद्दा मांडताना अमरावतीतून निवडून आलेल्या अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांनी सोमवारी शिवसेनेवर कडवी टीका केली. शिवसेनेचे नेते संसदेत येऊन शेतकऱ्यांचे मुद्दे मांडतात पण तिथे राज्यात लोकांनी महायुतीला बहुमत दिलेले असतानाही केवळ आपल्या स्वार्थासाठी, पदाच्या लालसेपोटी सरकार स्थापन करीत नाहीत, अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याला जर कोणी सर्वाधिक जबाबदार असेल, तर तो शिवसेनाच आहे, असाही आरोप त्यांनी केला.

मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी

लोकसभेमध्ये नवनीत कौर राणा यांनी टीका सुरू करताच शिवसेनेच्या खासदारांनी त्यांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. त्यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नवनीतकौर राणा यांना आपल्या मुद्द्यावरच बोलण्याची सूचना केली. त्यानंतरही त्यांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीवरून शिवसेनेवर टीका करणे सुरूच ठेवले. त्या म्हणाल्या, शिवसेनेला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल एवढी सहानुभूती होती तर त्यांनी आधी सरकार स्थापन करायला हवे होते. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्यामध्ये सर्वात मोठा हात शिवसेनेचाच आहे. त्यांनी जर खरंच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला असता तर राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी आपला पाठिंबा दिला असता. विदर्भात अवकाळी पावसामुळे सोयाबीन, कापूस, मूग, धान या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीकडून थोडं शिका, मोदींनी राज्यसभेत केलं कौतुक

दरम्यान, महाराष्ट्रातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी शिवसेनेच्या सर्व खासदारांनी आज सकाळी संसद भवनाबाहेर निदर्शने केली.