पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बीसीजी लस बंधनकारक असलेल्या देशांमध्ये कोरोनाचा मृत्यूदर कमी - संशोधन

कोरोना विषाणू (संग्रहित छायाचित्र)

ज्या देशांनी पूर्वीपासून नवजात अर्भकांना बीसीजीची लस देणे बंधनकारक केले होते. त्या देशांमध्ये इतर देशांच्या तुलनेत कोरोना विषाणूमुळे होणारा मृत्यूदर कमी असल्याचे पाहणीत आढळून आले आहे. भारत, पेरू, पोर्तुगाल आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये खूप आधीपासून नवजात अर्भकांना बीसीजीची लस देणे बंधनकारक आहे. क्षयरोगाचा सामना करण्यासाठी बालकांना जन्मानंतर ही लस देण्यात येते.

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

बेल्जियम, नेदरलँड्स, स्वित्झर्लंड, इक्वेडोर या देशांमध्ये नवजात अर्भकांना ही लस देणे बंधनकारक नाही. ते ऐच्छिक आहे. कोरोना विषाणू संक्रमणामुळे बुधवारी सकाळपर्यंत एकूण आठ देशांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा हिंदुस्थान टाइम्सने अभ्यास केला. या देशांमध्ये या आजारामुळे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण किती आहे, हे अभ्यासात बघण्यात आले आणि त्यावरून काही निष्कर्ष काढण्यात आले.

अमेरिकेतील काही संशोधकांनाही या संदर्भात केलेल्या अभ्यासातून असे आढळून आले आहे की ज्या देशांमध्ये आधीपासून बीसीजी लस बंधनकारक आहे तिथे कोरोनामुळे होणारा मृत्यूदर तुलनेत कमी आहे. भारत आणि चीनमध्ये आधीपासूनच या लस देणे बंधनकारक आहे. त्यामुळे तिथे तुलनेत कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी आहे. गेल्या महिन्यात एका आरोग्यविषयक नियतकालिकामध्ये या संशोधनाबद्दल माहिती देण्यात आली आहे. 

देशात १२ तासांत कोरोनाचे १२६३ नवे रुग्ण, ६६ जणांचा मृत्यू

ज्या देशांमध्ये बीसीजीची लस देणे बंधनकारक आहे त्या देशांमध्ये एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी सरासरी २.६५ जणांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. तर बीसीजीची लस ऐच्छिक असलेल्या देशांमध्ये एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी ९.१९ टक्के जणांचा मृत्यू झाल्याचे संशोधनात आढळून आले आहे.