पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शरद पवार-सोनिया गांधी यांच्यात जवळपास पाऊण तास चर्चा

शरद पवार सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. (Vipin Kumar)

राज्यातील सत्तास्थापनेच्या दिशेला दिल्लीच्या दरबारातून गती मिळणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी दुसऱ्यांदा काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाली. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात राज्यातील सत्तास्थापनेच्या तिढ्यासंदर्भात चर्चा अपेक्षित होती. त्यामुळे ही भेट राज्यातील सत्तास्थापनेच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण मानली जात आहे. 

राष्ट्रवादीकडून थोडं शिका, मोदींनी राज्यसभेत केलं कौतुक

राज्यात सत्तास्थापनेसंदर्भात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून एकत्रितपणे हालचाली सुरु असताना दिल्लीतील शरद पवारांच्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. सत्तास्थापनेचा प्रश्न भाजप-शिवसेनेला विचारा! असे पवारांनी प्रसारमाध्यमांसमोर म्हटले होते. उल्लेखनिय आहे की, शरद पवार यांनी सोनिया गांधीसोबत चर्चा केल्यानंतर राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती यापूर्वी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी रविवारी दिली होती. 

लोक येतील अन् जातील, पण ही व्यवस्था चालतच राहील : मोदी

काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी सत्तास्थापनेसंदर्भात एकसूत्री मसूदाही तयार केला आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय हा तिन्ही पक्षांचे प्रमुख घेतील, असे या तिन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले होते. राज्यातील सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु असल्याचे चित्र दिसत असले तरी किती बैठकीनंतर हा तिढा सुटणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Nationalist Congress Party President Sharad Pawar arrives to meet Congress Interim President Sonia Gandhi at her residence