पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एक्झिट पोलच्या नौटंकीला गांभीर्याने घेण्याची गरज नाही : शरद पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

एक्झिट पोल हे एक नाटक आहे. त्याला गांभीर्याने घेऊ नका, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे. रविवारी जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या संदर्भात ते बोलत होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) बहुमताने सत्ता स्थापन करु शकेल, असे भाकीत विविध एक्झिट पोलच्या माध्यमातून समोर आले होते.  

आघाडी सरकार नको, खंबीर नेतृत्त्व हवे हाच लोकांचा कल - जेटली

इस्लाम जिमखान्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार म्हणाले की, एक्झिट पोलमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. या परिणामांमुळे लोक अस्वस्थ आहेत. प्रसारमाध्यमांची विचारसरणी वेगळी आहे. त्यामुळे एक्झिट पोलला फारसे गांभीर्याने घेत नाही. २३ मे रोजी सर्व गोष्टी स्पष्ट होतील, असेही ते म्हणाले. 

मोदींनी ध्यान केलेल्या गुहेचे एक दिवसाचे भाडं माहीत आहे का?

या कार्यक्रमात पवार यांनी मोदींवरही टीका केली. देशातील निवडणूक झाल्यानंतर सत्ताधारी हिमालयात वेळ घालवत आहेत, असे भाष्य करत पवारांनी मोदींवरही निशाणा साधला. अखेरच्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडमधील केदारनाथ येथील गुहेत ध्यान-धारणा केली होती. नुकत्याच जारी झालेल्या एक्झिट पोलने एनडीच्या गोटात आनंद तर विरोधकांच्यात संभ्रम निर्माण झाले आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Nationalist Congress chief Sharad Pawar on Monday has mocked the election exit polls calling it a drama