पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अजित डोवाल यांच्याकडून दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागांची पाहणी

अजित डोवाल

नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन दिल्लीमध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हिंसाचार सुरु आहे. दिल्लीतील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी  राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल रस्त्यावर उतरले आहेत. अजित डोवाल दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. यावेळी ते नागरिकांशी बोलून परिस्थितीची माहिती घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजित डोवाल यांना हिंसाचाराने प्रभावीत झालेल्या उत्तर-पूर्व दिल्लीतील परिस्थिती सामान्य करण्याचे निर्देश दिले आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,  'जबाबदारी मिळाल्यानंतर ताबडतोब डोवाल यांनी दिल्ली पोलिस आयुक्त अमूल्य पटनायक आणि नव नियुक्त विशेष आयुक्त एस एन श्रीवास्तव आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसह हिंसाचारग्रस्त भागांचा पाहणी केली. याठिकाणी त्यांनी स्थानिक नागरिकांशी बोलून नेमकी परिस्थिती काय आहे हे जाणून घेतले.

केजरीवाल-सिसोदिया यांनी हिंसाचारग्रस्त भागांना भेट द्यावी

दरम्यान, दिल्लीमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याचे समर्थक आणि विरोधक आमने सामने आल्यानंतर हिंसाचाराला सुरुवात झाली. दिल्ली हिंसाचारामध्ये आतापर्यंत २२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये एका पोलिस हेड कॉन्स्टेबलचा समावेश आहेत. तर २५० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. यामध्ये ५६ पोलिसांचा समावेश आहे. हिंसाचाराची परिसंथिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत. 

हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांच्या कुटुंबीयांना १ कोटींची आर्थिक मदत