पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अद्ययावत करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

भारताची लोकसंख्या

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर) अद्ययावत करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. या कामासाठी ८५०० कोटी रुपयांच्या निधीलाही मंजुरी देण्यात आली असल्याचे पीटीआयने म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी या कामासाठी ८५०० कोटी रुपये देण्यात येत असल्याचे सांगितले.

बंगालमध्ये विद्यार्थ्यांनी राज्यपालांना अडवले, काळे झेंडेही दाखवले

पुढील वर्षी म्हणजेच २०२० मध्ये एप्रिल महिन्यात या कामाची सुरुवात होईल. या कामात देशात राहणाऱ्या नागरिकांची माहिती गोळा केली जाते. या आधी २०१५ मध्ये घरोघरी जाऊन नागरिकांकडून त्यांची माहिती गोळा करण्यात आली होती. ही सर्व माहिती डिजिटल स्वरुपात साठविण्याचे काम पूर्ण झाले होते.

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली झाली. या बैठकीत राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी माहिती अद्ययावत करण्याचे काम प्राधान्य क्रमांकावर होते.