पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हैदराबाद एन्काऊंटर: मानवाधिकार आयोगाने दिले चौकशीचे आदेश

हैदराबाद एन्काऊंटर

हैदराबादमध्ये महिला पशुवैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करुन तिची जाळून हत्या करणाऱ्या आरोपीच्या एन्काऊंटर प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेतली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माध्यमांच्या अहवालानुसार मानवाधिकार आयोगाने स्वत: याची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. तसंच, घटनास्थळी जाऊन तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

अजित पवारांना दिलेल्या क्लीन चीटशी माझा संबंध नाही - फडणवीस

तेलंगणा पोलिसांनी दावा केला आहे की, शुक्रवारी पहाटे ३ वाजता या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सर्व आरोपींना त्यांनी पाशवी कृत्य केले, तिथे नेण्यात आले होते. त्यावेळी आरोपींनी पोलिसांची बंदूक हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हे चौघेही मारले गेले. आरोपींनी त्याच ठिकाणी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिला जिवंत जाळले होते. तिथेच पोलिसांनी त्यांचा एन्काऊंटर केला. 

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचे एन्काऊंटर

दरम्यान, तेलंगणा पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे देशभरातून कौतुक होत आहे. ज्या पोलिसांनी आरोपींचे एन्काऊंटर केले त्यांचे कौतुक करत हैदराबादमधील जनतेने फटाके फोडत पुष्पवृष्टी केली. तसंच काही महिलांनी या पोलिसांना सॅल्यूट करत त्यांना मिठाई देत राखी बांधली. पोलिसांनी केलेली कामगिरी योग्य असल्याचे सांगत त्यांनी त्यांचे आभार मानले.   

फडणवीस सरकारचे अनेक निर्णय ठाकरे सरकारच्या स्कॅनरखाली