पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिमलामध्ये ढगफूटी; मणिमहेश यात्रा थांबवली

शिमला ढगफूटी

हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. बधाल येथे ढगफूटीमुळे घरांचे आणि राष्ट्रीय महामार्गाचे मोठे नुकसान झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग- ५ वर दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी महामार्ग बंद करण्यात आला आहे. तर चंबा येथे पूल वाहून गेल्यामुळे मणिमहेश यात्रा थांबवण्यात आली आहे.

भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या २२ वरिष्ठ अधिकाऱ्यांना 'नारळ'

शिमलाच्या रामपूर बुशहर येथील बधालमध्ये ढगफूटी झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्याप्रमाणात मलबा आला आहे. ढगफूटीमुळे घरं आणि गाड्या वाहून गेल्या आहेत. मुसळधार पावसामुळे किन्नोर, रिकॉंन्गपिओ, छितकुल आणि लाहौलला जोडणारा नॅशनल हायवे बंद करण्यात आला आहे. तर मणिमहेशला जाणाऱ्या रस्त्यावरील पूल पूराच्या पाण्यामध्ये वाहून गेला आहे. त्यामुळे मणिमहेश यात्रा थांबवण्यात आली आहे. सध्या बचावकार्य युध्द पातळीवर सुरु आहे.

अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे शिमलापासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या बधालमध्ये ढगफूटी झाली. बधाल येथील बाजारामध्ये असलेल्या दुकानांचे पूरामुळे मोठे नुकसान झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग- ५ वर झाडे कोसळून पडली आहे. तसंच मलबा आला आहे. त्यामुळे महामार्गावरील गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

राहुल गांधींच्या काश्मीर दौऱ्यावर मायावती संतापल्या

दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सोमवारी हिमाचल प्रदेशच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. या व्यतिरिक्त डोंगराळ भागामध्ये देखील काही भागात पावसाची शक्यता आहे. शिमलामध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. 

मनमोहन सिंग यांची एसपीजी सुरक्षा हटवणार