पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कलम ३७०: नॅशनल कॉन्फरन्सची सुप्रीम कोर्टात धाव

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्याच्या विरोधात नॅशनल कॉन्फरन्सने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पक्षाचे नेते मोहम्मद अकबर लोन आणि हसनेन मसुदी यांनी सर्वोच्च न्यायाल्यात याचिका दाखल करुन राष्ट्रपतींचा आदेश असंवैधानिक आणि अमान्य करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने पुनर्रचना विधेयकही असंवैधानिक घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पाकिस्तानने थार एक्स्प्रेस रोखली; भारताने दिले सडेतोड उत्तर

केंद्र सरकारने राज्यातील नागरिकांचे मत न जाणून घेता हा निर्णय घेतल्याचा आरोप नॅशनल कॉन्फरन्सने केला आहे. मोहम्मद अकबर लोन आणि हसनेन मसुदी लोकसभेचे सदस्य आहेत. यापूर्वी लोन हे जम्मू-काश्मीचे विधानसभेचे अध्यक्षही होते. मसुदी हे जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. त्यांच्या घटनापीठाने आपल्या एका निर्णयात कलम ३७० संविधान अस्थायी असल्याचे म्हटले होते. 

जम्मूमध्ये जमावबंदी हटवली; उद्यापासून शाळा होणार सुरु

नॅशनल कॉन्फरन्सच्या खासदरांना आपल्या याचिकेत म्हटले आहे की, कलम ३७० हटवण्याचा राष्ट्रपतींचा आदेश आणि राज्याच्या पुनर्रचना विधेयक मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करते. हा आदेश आणि विधेयक संविधानाच्या कलम १४ आणि २१ च्या अधिकारांचे उल्लंघन आहे.