पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विक्रम लँडर नासाच्या ऑर्बिटर कक्षेत आल्याचे स्पष्ट

ऑर्बिटरने चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या विक्रम लँडरचे छायाचित्र टिपले असल्याची माहिती इस्रोने दिली

चांद्रयान-२ या भारताच्या ऐतिहासिक माहिमेत विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा अंतिम टप्प्यातील प्रवास सुरु आहे. इस्रोचे अखेरच्या टप्प्यातील प्रयत्न सुरु असतानाच नासाच्या चंद्राभोवती फिरत असलेल्या ऑर्बिटरने चंद्रावरील विक्रम लँडरचा संपर्क तुटलेल्या क्षेत्रातील छायाचित्रे टिपल्याचे समोर येत आहे.  

राम मंदिरासाठी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा - नरेंद्र मोदी

नासाच्या एका शास्रज्ञाने दिलेल्या माहितीनुसार, नासाने आपल्या लूनर रिकॉनसेंस ऑर्बिटरच्या (LRO) च्या मदतीने १७ सप्टेंबर रोजी काही छायाचित्रे टिपली आहेत. नासाच्या शास्रज्ञांकडून सध्या या छायाचित्रांचा अभ्यास करण्यात येत आहे. नासाने चंद्रावरील ज्या भागाची छायाचित्रे टिपली आहेत त्याच ठिकाणापासून विक्रम लँडरचा आणि इस्रो मुख्यालयाचा संपर्क तुटला होता.  

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये दिवाळी बोनस

उल्लेखनिय आहे की, विक्रम लँडरशी संपर्क साधण्याची वेळ मर्यादा ही २१ सप्टेंबरपर्यंतच आहे. नासाचे वैज्ञानिक जॉन केलर यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून नासाने विक्रम लँडरचा संपर्क तुटला त्यावेळची छायाचित्र लूनर रिकॉनसेंस ऑर्बिटरने कैद केल्याचे स्पष्ट केले आहे.