पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनामुळे चीनमध्ये दिसून आला हा चांगला बदल

चीन

कोरोना विषाणूचे भीषण परिणाम जगाला भोगावे लागत आहेत, ६० पेक्षा जास्त देशात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, चीनमध्ये सर्वाधिक म्हणजे ३ हजारांहून जास्त कोरोनाचे बळी गेले आहेत. चीनमधलं वुहान हे कोरोनाचं केंद्रबिंदू आहे, गेल्या महिन्याभरापासून चीनमधले मोठ मोठे व्यापार उद्योग बंद आहेत, जगभरातल्या मल्टीनॅशनल कंपनींनीही आपल्या कंपन्या बंद ठेवल्या आहेत, वाहतूक व्यापर सारं काही कोरोनाच्या कचाट्यात सापडलं आहे. त्यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर याचे भीषण परिणाम दिसू लागले आहेत, मात्र कोरोनामुळे चीनमध्ये एक चांगला बदल दिसून आला आहे. तो म्हणजे असा की चीनच्या प्रदूषणाच्या पातळीत गेल्या काही दिवसांत कमालीची घट झाली आहे. 

कोरोनाच्या नव्या रुग्णांमुळे समोर आला नवा धोका

 जगातील सर्वांत प्रदूषित देशांच्या यादीत चीन आघाडीवर आहे. बिजिंगची गणना तर प्रदूषित शहरांमध्ये अव्वल स्थानी होते. मात्र 'नासा'नं जारी केलेल्या सॅटेलाइट इमेजनुसार चीनमधील हवेतील नायट्रोजन डायऑक्साइडच्या प्रमाणात कमालीची घट झालेली पाहायला मिळत आहे. श्वसनाच्या अनेक आजारांसाठी त्यातूनही अस्थमासाठी हा वायू कारणीभूत आहे. मात्र European Space Agency satellites च्या माहितीनुसार जानेवारीपासून चीनमधील हवेत याचे  प्रमाण कमी आढळून आले आहे परिणामी प्रदूषणात कमालीची घट झालेली पहायला मिळत आहे. 

कोरोनामुळे दीपिकानं पॅरिस फॅशन वीकला जाणं टाळलं!

चीन प्रदूषण

कोरोनामुळे चीनमधील अनेक उद्योगधंदे बंद आहे, यामुळे प्रदूषणात घट झालेली पहायला मिळत आहे. तसेच जानेवारीमध्ये चिनी नववर्षे असल्यानं दीर्घ सुट्ट्या होत्या त्यानंतर कोरोनामुळे या सुट्ट्या लांबवण्यात आल्या परिणामी उद्योग, फॅक्टरी मोठे प्लांट बंद असल्यानं  प्रदूषणाच्या पातळीच घट होऊन एक चांगला बदल दिसून आला. 

 

कोरोनामुळे इराणमध्ये ३४ कोल्हापूरकर अडकले, सुप्रिया सुळेंनी केली मदतीची विनंती