पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नासाने चांद्रयान-२ च्या विक्रम लँडरला शोधले, छायाचित्र केले जारी

नासाने चांद्रयान-२ च्या विक्रम लँडरला शोधले, छायाचित्र केले जारी  (Twitter/NASA)

चंद्राच्या पृष्ठभागावर या वर्षी सप्टेंबरमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या चांद्रयान २ च्या व्रिकम लँडरचे अवशेष अमेरिकन अंतराळ संस्था नासाने शोधून काढले आहे. मंगळवारी सकाळी नासने लूनर रेकॉन्सेन्स ऑर्बिटर (एलआरओ) कडून काढण्यात आलेले एक छायाचित्र जारी केले आहे. यामध्ये विक्रम लँडरमुळे प्रभावित झालेला भागही दिसून येतो. नासाने जारी केलेल्या एका निवेदनानुसार, चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडर सापडला आहे. छायाचित्रात निळ्या आणि हिरव्या रंगाच्या ठिपक्यांच्या माध्यमातून विक्रम लँडरचे अवशेष दाखवण्यात आले आहेत.

नासाने आपल्या निवदेनात म्हटले आहे की, त्यांनी २६ सप्टेंबरला कोसळलेल्या जागेचे एक छायाचित्र जारी केले होते आणि लोकांनी विक्रम लँडरच्या संकेतांचा शोध करण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर षण्मुग सुब्रमण्यम नावाच्या एका व्यक्तीने अवशेषाच्या एका सकारात्मक मान्यतेसह एलआरओ परियोजनेशी संपर्क केला. षण्मुगने कोसळलेल्या मुख्य ठिकाणापासून उत्तर-पश्चिममध्ये सुमारे ७५० मीटर अंतरावर अवशेषाची ओळख पटवण्यात आली. अवशेषाचे तीन सर्वांत मोठे तुकडे २x२ पिक्सलचे आहेत.