विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी हरियाणातील नूंह येथे आलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यावर निशाणा साधला. मोदी हे अदानी-अंबानींचे लाऊडस्पीकर असून दिवसभर त्यांच्याबाबतच बोलत राहतात, अशी टीका त्यांनी केली.
भारतीय वंशाचे अभिजित बॅनर्जी यांच्यासह तिघांना अर्थशास्त्राचे नोबेल
देशात बेरोजगारी आहे. अर्थव्यवस्थेची अवस्था वाईट आहे. सहा महिन्यांनतर काय होईल, ते पाहा. युवकांना जास्त वेळ मूर्ख बनवून सरकार चालवू शकत नाही. तुम्ही सहा महिने, एक वर्ष सरकार चालवू शकता. पण एक दिवस सर्व सत्य बाहेर येईल. मग पाहा देशात नरेंद्र मोदींचे काय होईल.
Rahul Gandhi, Congress, in Haryana's Nuh: Narendra Modi is the loudspeaker of Ambani, Adani. He talks about them the entire day. You can see the state of economy today, after 6 months you will notice the unemployment. You will see the unemployment in India. pic.twitter.com/oAuJd7H8UI
— ANI (@ANI) October 14, 2019
भारतात वेगवेगळ्या जाती आणि धर्माचे लोक राहतात. येथे श्रीमंत लोक, गरीब लोक एकत्र रहातात. यालाच आपण हिंदुस्थान किंवा भारत म्हणतो. काँग्रेस सर्वांचा पक्ष आहे. आमचे काम लोकांना जोडण्याचे आहे. पूर्वी इंग्रज ज्या पद्धतीने देशाला तोडण्याचे काम करत, देशातील लोकांमध्ये भांडण लावत तेच काम आज भाजप आणि आरएसएस करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
महात्मा गांधींनी आत्महत्या कशी केली?, गुजरातमध्ये शालेय परिक्षेत प्रश्न
नोटबंदी आणि जीएसटीवर बोलताना ते म्हणाले की, नोटबंदीमुळे देशातील सर्वांना रांगेत उभे केले. या रांगेत अनिल अंबानी किंवा अदानी यांनी तुम्ही पाहिले का असा सवाल केला. या दरम्यान कधीच कोणता काळा धंदा करणारा माणूस दिसला नाही. त्यानंतर गब्बरसिंह टॅक्स आला. छोटे दुकानदार, मध्यम उद्योग संपुष्टात आले आहेत. कारण त्यांचा व्यवसाय मोदींनी आपल्या १५-२० मित्रांना द्यायचा आहे, असा आरोपही त्यांनी केला.