पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्मृती इराणी सर्वात तरुण तर रामविलास पासवान सर्वात वयोवृद्ध मंत्री 

स्मृती इराणी आणि रामविलास पासवान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत ५७ मंत्र्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मोदींच्या नेतृत्वाखाली लोकसभेत अभूतपूर्व यशानंतर मंत्रीमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार अशी चर्चा रंगली होती. शपथविधी कार्यक्रमामध्ये त्याची प्रचती आली. मोदी पर्वाच्या दुसऱ्या पर्वात तब्बल १९ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.  

दुसऱ्या मोदी पर्वाला सुरुवात, मंत्रिमंडळात या नेत्यांची लागली वर्णी

मोदी सरकारच्या ५७ मंत्र्यांच्या यादीतील ४३ वर्षीय स्मृती इराणी या सर्वात तरुण मंत्री असून ७२ वर्षीय रामविलास पासवान हे सर्वात वयोवृद्ध मंत्री आहेत. यातील ९ मंत्र्यांकडे स्वतंत्र कार्यभार देण्यात आला आहे. मोदींच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणी यांच्यासह सहा महिलांचा समावेश आहे. 

मोदींच्या आईंनी टीव्हीवर पाहिला शपथविधीचा सोहळा

मोदींच्या नेतृत्वाखालली लोकसभा निवडणुकीत भाजपने २०१४ पेक्षा अधिक जागा मिळवून विक्रमी विजय नोंदवला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ३०३ तर घटकपक्षांसह (एनडीए) ३५३ जागा मिळाल्या होत्या. मंत्रिमंडळात वर्णी लागलेल्या नेत्यांना कोणती खाती मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Narendra Modi government smriti irani youngest and Ram Vilas Paswan oldest minister in new government