पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'हाऊडी मोदी' प्रमाणे 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमाची लगबग!

नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी 'हाऊडी मोदी'प्रमाणे 'नमस्ते ट्रम्प' असा कार्यक्रम होणार आहे.  भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.  डोनाल्ड ट्रम्प नागरिक अभिनंदन समितीच्यावतीने 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला कोणाला निमंत्रित करावे, याचे सर्व अधिकार हे अयोजन समितीकडेच असल्याची माहिती देखील रवीश कुमार यांनी दिली आहे.

आमचे १५ कोटी, १०० कोटींवर भारी; वारिस पठाणांचे वादग्रस्त वक्तव्य  

ट्रम्प यांच्या दौऱ्यासंदर्भात रवीश कुमार म्हणाले की, दिल्लीमध्ये मोदी आणि ट्रम्प  राजघाटला भेट देतील. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये हैदराबाद हाऊसमध्ये प्रतिनिधीमंडळ स्तरावरील बैठक पार पडेल. ट्रम्प पहिल्यांदा भारत दौऱ्यावर येत आहेत. मागील आठ महिन्यात मोदी आणि ट्रम्प यांची पाचव्यांदा भेट होणार आहे. 

दलितांवर अत्याचार केल्याचा राजस्थानातील व्हिडिओ भीषण - राहुल

ते पुढे म्हणाले, दुपारपर्यंत ट्रम्प अहमदाबादमध्ये पोहचतील. त्यानंतर ते नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमासाठी मोटेरा स्टेडियममध्ये उपस्थिती लावतील. अहमदाबाद विमानतळावरुन स्टेडियमपर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी होईल, असा अंदाजही रवीश कुमार यांनी व्यक्त केला आहे. मोदी-ट्रम्प यांच्यात  दहशतवाद्याच्या मुद्यावर चर्चा होणार का? या प्रश्नावर रवीश कुमार म्हणाले की, पुलवामा हल्ल्यानंतर भारत-अमेरिका या दोन राष्ट्रांतील संबंध मजबूत झाले आहेत, असे रवीश कुमार यांनी सांगितले.     

ट्रम्प यांचा दोन दिवसीय भारत दौरा 

अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प पुढील आठवड्यात पहिल्यांदा भारत दौऱ्यावर येत आहेत. अहमदाबादपासून ते आगरापर्यंत त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प २४ आणि २५ फेब्रुवारी या दोन दिवशी भारत दौऱ्यावर येणार आहेत. 

कोणता सर्जिकल स्ट्राईक केला?, कमलनाथांचा भाजपला सवाल