पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नरेंद्र मोदींचे स्वागत... आणि दिलगिरीही, तुलसी गबार्ड यांचा संदेश

तुलसी गबार्ड

'हाऊडी मोदी' कार्यक्रमाच्या निमित्ताने ह्युस्टनमध्ये येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्या तुलसी गबार्ड यांनी स्वागत केले आहे. त्याचवेळी या कार्यक्रमाला आपण पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार उपस्थित राहू शकणार नसल्याबद्दल त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे.

मुंबईत चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला; जीवितहानी नाही

नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी केलेल्या व्हिडिओ संदेशामध्ये तुलसी गबार्ड यांनी म्हटले आहे की, नमस्ते, अमेरिकेच्या दौऱ्यावर येत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी मनापासून स्वागत करते. काही पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मी हाऊडी मोदी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाही, याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. संपर्ण अमेरिकेतून आलेले अनेक अमेरिकी भारतीय नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. याबद्दल मला खूप आनंद होतो आहे.

मोटार वाहन कायद्यात दंड वाढविण्याला अनेक राज्यांचा होकारच होता

तुलसी गबार्ड यांनी म्हटले आहे की, भारत हा जगातील मोठा लोकशाही देश आहे. त्याचबरोबर अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार आहे. दोन्ही देशांनी एकत्रितपणे काम करून द्विपक्षीय आणि जागतिक मुद्द्यावर मार्ग शोधले पाहिजेत. यामध्ये प्रामुख्याने वातावरण बदल, अण्वस्त्र युद्ध रोखणे, दोन्ही देशांच्या आर्थिक स्थितीत आणखी सुधारणा करणे याचा समावेश होतो.