पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हिमालयात हिममानव असल्याचा भारतीय सैन्याचा दावा, पुरावे केले सादर

हिममानवाच्या पाऊलखुणा

भारतीय लष्कराने पहिल्यांदाच हिममानव असल्याचा दावा केला आहे. यासंबंधीचे छायाचित्र सैन्यदलाने प्रसिद्ध केले आहे. या छायाचित्रात बर्फावर काही खुणा दिसत आहेत. या खुणा हिममानवाच्या (यती) असू शकतात. सैन्यदलाने यासंबंधी ट्विट केले आहे. 'पहिल्यांदा भारतीय सैन्याच्या माऊंटरिग एक्सपेडिशन पथकाने ९ एप्रिलला मकालू बेस कॅम्पच्या जवळ सुमारे ३२x१५ इंचाच्या हिममानवाच्या पाऊलखुणा  पाहिल्या. यापूर्वी मकालू-बरुन नॅशनल पार्कमध्ये हिममानव दिसला होता,' असे या टि्वट सैन्यदलाने केले आहे.

हिममानव जगातील सर्वांत रहस्यमयी प्राण्यांपैकी एक आहे. अनेकवेळा तो दिसल्याचे वृत्त जगभरात प्रसिद्ध झाले आहे. लडाखमधील बौद्ध मठांनी हिममानव दिसल्याचा दावा केला आहे. काही अभ्यासकांच्या मते, ही हिमालयात आढळून येणारी अस्वलाची एक प्रजाती आहे. तर काहींच्या मते, ही पोलर बिअरचा प्रजाती आहे. यावरुन अनेक मतांतरे आहेत.