पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माझे वक्तव्य हिंदूविरोधी असल्याचे पसरवले जात आहे - कमल हासन

कमल हासन

मक्कल नीधी मयम (MNM) पक्षाचे प्रमुख आणि ज्येष्ठ अभिनेते यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यावर बुधवारी खुलासा केला आहे. मी केवळ धार्मिक असहिष्णूतेबद्दल बोलत होतो. कट्टरता मग ती कोणत्याही धर्मातील असू दे त्याचा निषेधच केला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

देशातील पहिला दहशतवादी हिंदू होता आणि त्याचे नाव नथुराम गोडसे होते, असे वक्तव्य कमल हासन यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर देशभरातून टीका करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या वक्तव्यावर नव्याने खुलासा केला आहे. 

राजकीय स्वार्थासाठी सरसकट हिंदूनाच दहशतवादी ठरवलं जातंय- शरद पोंक्षे 

कमल हासन म्हणाले, मी केवळ धार्मिक असहिष्णूतेबद्दल बोलत होतो. सर्व धर्मातील लोकांना एकत्रितपणे गुण्यागोविंदाने राहता आले पाहिजे. कट्टरतावाद मग तो कोणत्याही स्वरुपातील असू दे त्याचा निषेधच केला पाहिजे. पण माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. माझे बोलणे हिंदूविरोधी असल्याचे पसरवले जात आहे. दूष्ट हेतूनेच काही जणांकडून असे केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे देशातील सामान्य लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तामिळनाडूतील अरवाकुरुची विधानसभा मतदारसंघात आयोजित प्रचारसभेत बोलताना कमल हासन यांनी हे वक्तव्य केले होते. 'सभेत मुस्लिम लोक आहेत म्हणून मी हे बोलत नाही. इथे महात्मा गांधींचा पुतळा आहे. म्हणून मी हे तुम्हाला सांगतोय. स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हा हिंदू होता. नथुराम गोडसे त्याचे नाव आहे,' असे वक्तव्य कमल हासन यांनी जाहीर सभेत केले होते.