पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चिदंबरम यांचे वजन ५ किलोने कमी झाले, आता तरी सुटका करा; कोर्टात युक्तिवाद

पी चिदंबरम

आयएनएक्स मीडिया प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी जामीनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. याच प्रकरणात सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी चिदंबरम यांना जामीन मंजूर केला होता. पण सक्तवसुली संचालनालयाने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे सीबीआयच्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतरही चिदंबरम यांची कारागृहातून सुटका झालेली नाही. 

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी खूशखबर, रब्बी पिकांच्या हमीभावात वाढ

गेल्या दोन महिन्यांपासून कारागृहात असल्यामुळे चिदंबरम यांची तब्येत बिघडली असल्याचे त्यांच्या वकिलांनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले. आतापर्यंत दोन वेळा ते कारागृहात आजारी पडले आहेत. त्याचबरोबर त्यांचे वजन पाच किलोने कमी झाले असल्याचेही त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. दिल्लीमध्ये आता थंडी पडण्यास सुरुवात होईल. त्याचबरोबर डेंग्यूची लागण होण्याची शक्यताही वाढेल. यामुळे चिदंबरम यांच्या प्रकृतीला आणखी धोका आहे. तो न्यायालयाने विचारात घेऊन त्यांना जामीन मंजूर करावा, अशी विनंती त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केली.

BSNL आणि MTNL च्या विलिनीकरणाला कॅबिनेटची मंजुरी

चिंदबरम यांना जामीन मंजूर केल्यास ते परदेशात पळून जातील, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात केला होता. पण न्यायालयाने तो फेटाळला. चिदंबरम परदेशात पळून जाण्याचा शक्यता नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.