पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जीवरक्षक औषधांवरील बंदी उठविल्यानंतर राहुल गांधी म्हणाले...

राहुल गांधी

कोरोना विषाणूच्या संक्रमणामध्ये केंद्र सरकारने मंगळवारी जीवरक्षक म्हणून समजल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि पॅरासिटामॉल या दोन औषधांवरील निर्यात बंदी काही प्रमाणात उठविली. त्यानंतर लगेचच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावर आपली भूमिका मांडली आहे.

राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, प्रत्युत्तराची भाषा वापरणे ही मैत्री नाही. ज्या देशांना सध्या गरज आहे त्यांना भारताने मदत केली पाहिजे. पण त्याचवेळी सध्याच्या स्थितीत जीवरक्षक ठरलेली औषधे भारतीयांसाठी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिली पाहिजेत. 

देशातील रुग्णांची गरज लक्षात घेऊनच सध्याच्या स्थितीत जीवरक्षक ठरलेली मलेरियारोधक हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि पॅरॅसिटामॉल ही दोन्ही औषधे इतर देशांना पुरविली जातील, असे या निर्णयाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या औषधांची निर्यात रोखून धरण्यावरून भारताला लक्ष्य केले होते. जर अमेरिकेची मागणी भारताने पू्र्ण केली नाही तर प्रत्युत्तर दिले जाईल, असे त्यांनी व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत म्हटले होते. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये प्रत्युत्तराचा उल्लेख केला आहे.