पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राहुल गांधींच्या 'रेप इन इंडिया' कमेंटवरून संसदेत मोठा गदारोळ, भाजप आक्रमक

लोकसभेत बोलताना स्मृती इराणी (फोटो सौजन्य - लोकसभा टीव्ही/एएनआय)

झारखंडमधील प्रचारसभेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या एक वक्तव्यामुळे शुक्रवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत मोठा गदारोळ झाला. भाजपच्या महिला खासदारांनी राहुल गांधी यांच्या त्या वक्तव्यावरून लोकसभेत घोषणा देत त्यांच्या माफीची मागणी केली. राहुल गांधी यांनी 'रेप इन इंडिया' म्हणत देशातील सर्व महिलांचा अपमान केला आहे. त्यांनी माफी मागितलीच पाहिजे, अशी मागणी भाजपच्या महिला खासदारांनी केली.

कलम ३७०, नागरिकत्व दुरुस्तीनंतर आता भाजपचा या दोन कायद्यांवर फोकस

भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, भारतातील महिलांवर बलात्कार व्हायला पाहिजे, अशा स्वरुपाचे गंभीर वक्तव्य देशातील नेत्याकडून पहिल्यांदाच करण्यात आले आहे. राहुल गांधी यांना हाच संदेश देशातील लोकांना द्यायचा आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

राज्यसभेतही या मुद्द्याचे पडसाद उमटले. भाजपच्या सदस्यांनी 'राहुल गांधी माफी मांगो' अशा घोषणा दिल्या. सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने दोन्ही सभागृहांचे कामकाज तासाभरासाठी तहकूब करण्यात आले होते. 

गुरुवारी झारखंडमधील गोड्डामध्ये जाहीर सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी म्हणाले होते 'मेक इन इंडिया'. पण देशात सध्या कुठेही बघितले की 'रेप इन इंडिया' असेच दिसते आहे. उत्तर प्रदेशात भाजपच्या एका आमदाराने महिलेवर बलात्कार केला. नंतर त्या महिलेच्या गाडीला अपघात झाला. पण नरेंद्र मोदी यांनी त्याबद्दल चकार शब्द काढला नाही. 

'पक्षाविरुध्द कारवाई केली तर गय केली जाणार नाही'

नरेंद्र मोदी म्हणतात बेटी बचाओ, बेटी पढाओ पण नक्की कोणापासून बेटी बचाओ हे ते सांगत नाहीत. भाजपच्याच आमदारांपासून मुली वाचविल्या पाहिजेत, असेही राहुल गांधी या सभेत म्हणाले होते.