पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'अयोध्येतील जागा मुस्लिमांनी राम मंदिरासाठी देऊन टाकावी'

झमीर शाह

अयोध्येतील वादग्रस्त जागा मुस्लिम समुदायाने सदिच्छेने राम मंदिर बांधण्यासाठी हिंदूंना देऊन टाकावी, असे मत अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) झमीर उद्दिन शाह यांनी व्यक्त केले. लखनऊमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे मत मांडले.

रस्त्याच्या कडेला झोपलेल्या भाविकांना बसने चिरडले; ७ जणांचा मृत्यू

अयोध्येतील राम मंदिराच्या प्रश्नावर न्यायालयाबाहेर तोडगा निघावा, यासाठी मुस्लिमांच्या एका संघटनेने लखनऊमध्ये संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला झमीर शाह उपस्थित होते. ते म्हणाले, अयोध्येतील ती वादग्रस्त जागा मुस्लिमांनी सदिच्छेने हिंदूंना देऊन टाकावी, अशी माझी इच्छा आहे. यामुळे देशातील सामाजिक सलोखा आणि शांतता आणखी वृद्धिंगतच होईल. सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणी बहुमत असलेल्या समुदायाच्या बाजूने निकाल द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

ऐन निवडणुकीत पुण्यात काँग्रेसला आणखी एक धक्का

या प्रकरणात जरी सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम संघटनेच्या बाजूने निकाल दिला. तरीही हिंदूंचा त्याला विरोधच राहिल. त्यामुळे तिथे पुन्हा मशिद उभी करता येणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. हा प्रश्न न्यायालयाच्या कक्षेत सोडविण्यापेक्षा तो सामोपचाराने सोडवला तर जास्त चांगले होईल, अशी अपेक्षा झमीर शाह यांनी व्यक्त केली.