पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतात मुसलमानांवर कधीही अत्याचार झाला नाहीः आरएसएस

भैयाजी जोशी

भारतात मुसलमानांवर कधीच अत्याचार झाला नसल्याचे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरचिटणीस भैयाजी जोशी यांनी केले आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत (सीएए) चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. भारताच्या ७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संघ मुख्यालयात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमानंतर ते बोलत होते. 

गृहमंत्री देशमुख म्हणाले, न्या. लोया प्रकरणाचा पुन्हा तपास नाही

सीएएविषयी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, आतापर्यंत मुस्लिम समाजाला या देशात कोणत्याही छळाला सामोरे जावे लागलेले नाही. जर तेथून एखादा नागरिक आला आणि तो मुसलमान असला तरी त्याला कायद्याच्या हिशोबानेच नागरिकत्व प्राप्त करता येऊ शकते. यामध्ये अडचण काय आहे?, असा सवालही त्यांनी विचारला. 

पद्म पुरस्कार 2020, संपूर्ण यादी एका क्लिकवर...

गांभीर्याने विचार न करता चुकीच्या माहितीच्या आधारे प्रसार केला जात आहे. जर सीएएमागील भावनांना योग्य पद्धतीने समजावून घेतले गेले तर विरोधाचा सामना करावा लागला नसता. संसदेने तो कायदा संमत केला आहे आणि आता तो सर्वांनी स्वीकारणे अनिवार्य आहे. 

प्रजासत्ताक दिनी आसाम स्फोटांनी हादरले, ग्रेनेड हल्ल्याची शक्यता

कोणताही विदेशी येथे राहू नये म्हणून हे देशासाठी अनिवार्य आहे. हा कायदा फक्त पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील हिंदूना नाही तर जैन, शीख, बौद्ध आणि ख्रिश्चन यांनाही नागरिक बनण्याची परवानगी देते. त्यामुळे अशांतता निर्माण करणे चांगले नाही.