पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मुस्लिमांकडे राहण्यासाठी १५० देश आहेत, हिंदूजवळ केवळ भारत आहे'

गुजराथचे मुख्यमंत्री विजय रुपाणी

राहण्यासाठी मुस्लिमांकडे जगात १५० देश आहे ते कोणत्याही देशाची निवड करू शकतात मात्र,  हिंदूसाठी केवळ भारत हा एकमेव देश आहे,  असं म्हणत गुजराथचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी सुधारित नागरिकत्त्व कायद्याचे समर्थन केले आहे. साबरमती आश्रम परिसरात सुधारित नागरिकत्त्व कायद्याचे समर्थन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत ते बोलत होते. या कायद्याला विरोध करण्याऱ्या काँग्रेस पक्षालाही त्यांनी फटकारले आहे. 

काश्मीर खोऱ्यातून सात हजार जवान माघारी, गृहमंत्रालयाचा निर्णय

डिसेंबर २०१४ पर्यंत  अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशमधून आलेल्या मुस्लिम वगळता अन्य धर्माच्या नागरिकांना नागरिकत्त्व देण्याला विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या भूमिकेवर रुपाणी यांनी  कडाडून टीका केली आहे. 'फाळणीच्यावेळी पाकिस्तानात २२ टक्के मुस्लिम होते. मात्र आता हिंदूची पाकिस्तानातील लोकसंख्या केवळ ३ टक्के उरली आहे. सतत होणारे अत्याचार, बलात्कार, दुय्यम वागणूक याला कंटाळून हिंदू भारतात येत आहेत. आम्ही हिंदूनां मदत करत आहोत, मात्र काँग्रेस या गोष्टीला विरोध करत आहेत' असं ते या रॅलीत म्हणाले. 

...तर ओवेसी सूर्य पश्चिमेला उगवतो असे म्हणतील: अमित शहा

 'अफगाणिस्तानात २ लाख हिंदू आणि शिख होते आता केवळ ५०० उरले आहेत. मुस्लिमांना राहण्यासाठी १५० देश आहेत तिथे ते जाऊ शकतात, मात्र हिंदूसाठी एकच देश आहे तो म्हणजे भारत, मग जर हिंदूनां परतायचं असल्यास त्यात वाईट ते काय?', असाही सवाल त्यांनी पक्षाला विचारला आहे.