पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'नमाज पठण करतात म्हणून मुस्लिम बांधव रस्त्यावर हक्क सांगू शकत नाहीत'

सर्वोच्च न्यायालय

अयोध्येतील वादग्रस्त जागेवर मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले आहे म्हणून ते त्या जागेवर हक्क सांगू शकत नाहीत, असा युक्तिवाद या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवेळी रामलला विराजमान पक्षकारांच्या वकिलांनी केला. आपल्या युक्तिवादाच्या समर्थनार्थ सी एस वैद्यनाथन म्हणाले की, मुस्लिम बांधवांकडून अनेक ठिकाणी रस्त्यावरही नमाज पठण केले जाते. म्हणून ते त्या जागेवर हक्क सांगू शकत नाहीत. अयोध्येतील वादग्रस्त जागी देवतांच्या मूर्तीचे अनेक अंश मिळाले आहेत, याकडे त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.

भविष्यात अण्वस्त्रांचा वापर त्यावेळच्या स्थितीवर अवलंबून - राजनाथ सिंह

वैद्यनाथन यांनी आपला युक्तिवाद करताना सांगितले की, अयोध्येतील वादग्रस्त जागेवर असलेल्या मशिदेचे बांधकाम इतर मशिदींसारखे नव्हते. इस्लाम धर्माच्या परंपरा आणि श्रद्धांच्या विपरित या वास्तूचे बांधकाम होते. जिथे नमाज पठण केले जाते तिथे कुठल्याही व्यक्तीचा फोटो असू नये, असे इस्लाममध्ये सांगितले जाते. वैद्यनाथन यांनी १९९० मध्ये या ठिकाणी घेतलेले काही फोटोही खंडपीठापुढे सादर केले.

काश्मीरमधील स्थिती सुधारेल, थोडा धीर धरा; केंद्राचा कोर्टात युक्तिवाद

अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशिद प्रकरणी सध्या सर्वोच्च न्यायालयात कामकाजाच्या दिवशी दररोज सुनावणी सुरू आहे. या आधीच्या सुनावणीवेळी वैद्यनाथन यांनी या जागेवरील बाबरी मशिद ही मंदिराच्या ठिकाणी उभारण्यात आल्याचा दावा केला. त्याचबरोबर ही जमीन कोणाचीही नव्हती, हा युक्तिवाद पूर्णपणे चुकीचा असल्याचे म्हटले आहे.