पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुस्लिम या देशाचे भाडेकरु नाहीतः ओवेसी

असद्दुद्दीन ओवेसी

भाजपची सत्ता आली म्हणून देशातील मुसलमानांनी घाबरु नये. मुसलमान देशाचे हिस्सेदार आहेत, भाडेकरु नाहीत. त्यांना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार हा संविधानानुसार मिळाला आहे. जर मोदी मंदिरात जाऊ शकतात तर मुसलमानही मशिदीत जाऊ शकतात, असे वक्तव्य एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केले. ते हैदराबाद येथील मक्का मशिदीत एक सभेला संबोधित करत होते. 

मोदींचे अल्पसंख्यांकाबद्दलचे वक्तव्य ढोंगीपणाचे-ओवेसी

ते पुढे म्हणाले, भारताच्या पंतप्रधानाने ३०० जागा जिंकल्यामुळे मनमानी करता येईल असा जर कोणी विचार करत असेल, तर हे कदापि शक्य नाही. मी पंतप्रधानांना सांगू इच्छितो की, संविधानाचा हवाला देत असदुद्दीन ओवेसी तुमच्याशी लढेल, न्यायासाठी लढेल. 

बुरखा बंदीवर ओवेसी म्हणाले, शिवसेनेकडून तुम्ही आणखी काय अपेक्षा ठेवाल

भारताला समृद्ध ठेवायचे आहे. आम्ही भारताला समृद्ध ठेवू. आम्ही येथे समसमान नागरिक आहोत, भाडेकरु नाही तर हिस्सेदार आहोत. जेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिरात जाऊ शकतात तर तुम्हीही अभिमानाने मशिदीत जाऊ शकता, असे ते म्हणाले.

दानवेंनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला, खैरेंचा आरोप

त्याचवेळी ओवेसींनी मुसलमान आणि दलितांच्या एकतेवर जोर दिला. एमआयएम मुसलमान, दलित आणि वंचितांच्या अधिकारासाठी लढेल. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना मोठा भाऊ म्हटले. मुसलमान आणि दलित मतांमुळेच महाराष्ट्रात औरंगाबादेत एमआयएमला एक जागा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.