पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मशिदीत जाण्यास मुस्लिम महिलांना परवानगी, सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस

संग्रहित छायाचित्र

सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व मशिदींमध्ये मुस्लिम महिलांना प्रवेश देण्यासंबधीच्या जनहित याचिकेवर शुक्रवारी केंद्र सरकारला उत्तर मागितले आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्या. एस ए बोबडे आणि न्या. एस ए नझीर यांच्या खंडपीठाने मशिदींमध्ये महिलांना प्रवेश देण्याची विनंती करणाऱ्या  याचिकेवर केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालय तसेच अल्पसंख्यक प्रकरणाच्या मंत्रालयाला नोटीस जारी केली आहे.

काँग्रेस सोडून भाजपत गेलेले अल्पेश ठाकोरही पराभूत

ही याचिका यास्मीन जुबेर अहमद पीरजाद यांनी दाखल केली आहे. यामध्ये सरकारी अधिकारी आणि वक्फ बोर्डसारख्या मुस्लिम संस्थांना महिलांना प्रवेश देण्याची विनंती केली आहे. एखाद्या ठिकाणी प्रवेश रोखणे हे मुलभूत अधिकाराचे उल्लंघन असल्याच्या आधारावर ही विनंती करण्यात आली आहे.

आठवले म्हणतात, रिपाइंला हवं १ कॅबिनेट आणि १ राज्यमंत्रिपद