पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीरप्रकरणी पाठिंबा मागत असलेल्या पाकला मुस्लिम देशांचा सल्ला

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानने जगभरातील देशांचे दरवाजे ठोठावले पण चीनशिवाय कोणत्याच देशाची त्यांना साथ लाभली नाही. आता मुस्लिम देशांनी त्यांना सल्ला दिला आहे. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातसारख्या प्रभावशाली मुस्लिम देशांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला भारताबरोबर पडद्यामागून चर्चा (बॅकडोअर डिप्लोमसी) सुरु करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलताना कठोर शब्द वापरु नये असेही सांगितले आहे.

राष्ट्रपतींच्या विमानाला ३ तास उशीर झाल्यावर सविस्तर चौकशीचे आदेश

पाकिस्तानी वृत्तपत्र 'एक्स्प्रेस ट्रिब्यून'च्या वृत्तानुसार, ३ सप्टेंबरला सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री आदिल अल जुबेर आणि संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला बिन अल नाहयान इस्लामाबाद दौऱ्यावर आपल्या नेतृत्वाचा आणि काही इतर शक्तीशाली देशांचा संदेश घेऊन आले होते. त्यांनी पाकिस्तानला भारताशी अनौपचारिक चर्चा करण्यास सांगितले आहे. एकदिवसीय दौऱ्यावर त्यांनी पंतप्रधान इम्रान खान, परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी आणि लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची भेट घेतली. 

ही चर्चा खूप गोपनीय होती आणि परराष्ट्र मंत्रालयातील केवळ आघाडीचे अधिकारीच यावेळी उपस्थित होते. दोन्ही देश शांतता नांदण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी काम करु इच्छितात.

आंध्र प्रदेशच्या माजी विधानसभा अध्यक्षांची आत्महत्या

काश्मीरमधील निर्बंध सैल करण्यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजी करण्याचा प्रयत्न करु शकतात. पण यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील शाब्दिक युद्ध बंद केले पाहिजेत, असे या देशांनी म्हटले आहे.