पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुर्शिदाबाद तिहेरी हत्याकांडः विम्याच्या पावतीवरुन झालेल्या वादातून तिघांचा खून

मुर्शिदाबाद तिहेरी हत्याकांडः विम्याच्या पावतीवरुन झालेल्या वादातून तिघांचा खून

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये तिहेरी हत्याकांडाचे गूढ अखेर उलगडले आहे. मंगळवारी पोलिसांनी तिहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपीला अटक केली. संशयित आरोपीने गुन्हा कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. जीवन विमा पॉलिसीची पावती न दिल्यामुळे मृत प्रकाश पाल आणि संशयित आरोपीत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता, आणि त्याचेच पर्यावसन तिघांच्या हत्येत झाल्याचे पोलिसांनी म्हटले. 

मंगळवारी सकाळी साहपूर परिसरातील सागरडिह येथून संशयित आरोपी उत्पल बेहराला अटक केल्याचे मुर्शिदाबादचे पोलिस अधिक्षक मुकेश कुमार यांनी सांगितले.  

भारतीय अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत, नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी

दि. ८ ऑक्टोबरला दुर्गा पुजेदरम्यान मुर्शिदाबाद जिल्ह्यातील प्रकाश पाल, त्यांची ८ महिन्याची गर्भवती पत्नी आणि ६ वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आली होती. प्रकाश आणि त्यांच्या पत्नीचा चाकून भोसकून तर मुलाचा टॉवेलने गळा आवळून खून करण्यात आला होता. प्रकाश पाल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असल्याचे भाजपने म्हटले होते.

संशयित आरोपी राजमिस्त्री उत्पल बेहराने पाल यांच्याकडे दोन जीवन विमा पॉलिसासाठी पैसे दिले होते. पाल यांनी बेहराला एक विमा पॉलिसीच्या पैशांची पावती दिली. पण दुसऱ्या पॉलिसीची पावती त्याने दिली नाही. यावरुन दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरु होते. मृत पाल यांनी आरोपी बेहराचा अपमानही केला होता. त्याच अपमानामुळे बेहराने हत्या करण्याचा निर्णय घेतला.

नालासोपारा पोलिस ठाण्यात गळा चिरून आरोपीची हत्या

बेहराने गुन्हा कबूल करण्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पाल आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्येनंतर बंगालमध्ये भाजपने तृणमूल काँग्रेसवर आरोप केले होते.