पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बाप रे!, समुद्राच्या पाणी पातळीत वाढीचा मुंबईला मोठा धोका - आंतरराष्ट्रीय संशोधन

समुद्र किनारा (प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई, नवी मुंबई आणि कोलकाता या शहरांसह किनाऱ्यावरील साडेतीन कोटी नागरिकांना २०५० सालापर्यंत समुद्रातील पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे पुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील एका संशोधन संस्थेने या संदर्भातील आपल्या आधीच्या अनुमानात सुधारणा करून नवा अंदाज वर्तविला आहे. आधी समुद्राच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे किनाऱ्यावरील ५० लाख लोकांना फटका बसण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन तातडीने मोठ्या प्रमाणात कमी केले नाही तर हा फटका वेगाने बसणार असल्याचे या संशोधनात म्हटले आहे.

पुण्यातील जनता सहकारी बँक, जळगाव पिपल्सवर आरबीआयची कारवाई

अमेरिकास्थित हवामान बदलाविषयी संशोधन करणाऱ्या संस्थेने हे अंदाज वर्तविले आहेत. मुंबई, नवी मुंबई आणि कोलकातामधील नागरिकांना याचा मोठा फटका बसू शकतो, असे या संस्थेने म्हटले आहे. नासाच्या 'शटल रडार टोपोग्राफी मिशन'च्या आधारे आधीचे अंदाज वर्तविण्यात आले होते. पण त्यामध्ये या धोक्याचा तितक्या स्पष्टतेने विचार करण्यात आला नव्हता. पण नव्या अभ्यासामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापर करण्यात आला. त्यामुळे आधीच्या अभ्यासातील त्रुटी दूर करणे शक्य झाले. २०५० पर्यंत समुद्राच्या पाणी पातळीत वाढ झाल्याची झळ जगभरातील ३० कोटी नागरिकांना बसणार आहे, असेही या संशोधनात म्हटले आहे. या काळात समुद्रातील लाटांची उंची आणखी वाढणार आहे. त्यामुळे किनाऱ्यावरील आणि समुद्राला आत ढकलून तयार करण्यात आलेल्या भागाला याचा मोठा फटका बसेल, असे या संशोधनात म्हटले आहे.

काश्मीर भेटीनंतर युरोपियन युनियनचे प्रतिनिधी म्हणाले...

गेल्या शतकात समुद्राच्या पाणी पातळीत जगभराच्या सरासरीत ११ ते १६ सेंटिमीटरने वाढ झाली होती. या शतकांमध्ये जरी आपण कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन वेगाने कमी केले तरी पाणी पातळी आणखी ०.५ मीटरने वाढ होणार आहे. पण जर हे उत्सर्जन रोखण्याकडे आपण अजून दुर्लक्ष केले तर समुद्राची पाणी पातळी या शतकात २ मीटरपर्यंत वाढ होऊ शकते. ज्याचा फटका सगळ्यांना बसणार आहे.