पंचतारांकित हॉटेलमध्ये ग्राहकांकडून खाद्यपदार्थांवर आकारलं जाणारं मोठं शुल्क हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलं आहे. अभिनेता राहुल बोसकडून एका पंचतारांकित हॉटेलनं दोन केळ्यांसाठी ४४२ रुपये आकारले होते. हे उदाहरण ताजं असताना एका ग्राहकाकडून दोन अंड्यांसाठी मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलनं १७०० रुपये आकारल्याचं समोर आलं आहे. या ग्राहकाचं नाव कार्तिक धर असून मुंबईतल्या फोर सिझन हॉटेलमध्ये त्याच्यासोबत हा प्रकार घडल्याचं त्यानं निदर्शनास आणून दिलं.
इंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड; नितीन गडकरी करत होते प्रवास
कार्तिकनं हॉटेलमधील बिलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये दोन उकडलेल्या अंड्यांसाठी त्याच्याकडून हॉटेलनं १७०० रुपये, ऑमलेटसाठी ८५० आणि डाएट कोकसाठी २६० रुपये आकारल्याचं त्यानं म्हटलं आहे. आपल्या ट्विटर पोस्टमध्ये त्यानं अभिनेता राहुल बोसलाही टॅग केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पंचतारांकित हॉटेलमध्ये पदार्थांची चढी किंमत हा चर्चेचा विषय ठरली आहे.
2 eggs for Rs 1700 at the @FourSeasons Mumbai. @RahulBose1 Bhai Aandolan karein? pic.twitter.com/hKCh0WwGcy
— Kartik Dhar (@KartikDhar) August 10, 2019
सर्व सार्वजनिक बँका सकाळी ९ वाजता उघडणार
यापूर्वी चंढीगडमधल्या जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेलनं राहुल बोसकडून दोन केळ्यांसाठी ४४२ रुपये आकारले होते. राहुलच्या ट्विटनंतर जीएसटी कलम ११ चं उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेलला २५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. नियमाप्रमाणे ताज्या फळांवर जीएसटी आकारला जात नाही त्यामुळे चंढीगडमधल्या या पंचतारांकित हॉटेलला शिक्षा ठोठावण्यात आली होती.