पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, 'जैश'कडून दहशतवादी हल्ल्याची शक्यता

मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर, 'जैश'कडून दहशतवादी हल्ल्याची शक्यता(Getty Images)

पुन्हा एकदा मुंबई दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आली आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलांसह मुंबईसारख्या काही शहरांवर दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहे. गुप्तचर यंत्रणांनी सरकारला ही माहिती दिली आहे. काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर जैश-ए-मोहम्मदने दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचला आहे. देशाची आर्थिक राजधानी उद्ध्वस्त करण्याची त्यांची योजना असू शकते. 

26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद दोषी

जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यामुळे भारतात पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याच्या घटना घडू शकतात, असा इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी दिला होता. ज्यावेळी इम्रान खान यांनी हे चिथावणीखोर वक्तव्य केले. त्याचवेळी जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढण्यात आला होता. तसेच जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक संमत करत सरकारने काश्मीरला केंद्रशासित राज्याचा दर्जा दिला होता. त्यानंतर पाकिस्तान आणि भारतातील संबंधांमधील तणावाची स्थिती आणखीनच वाढली.

इम्रान खान यांचे हे वक्तव्य म्हणजे पाकिस्तान दहशतवादी गटांना समर्थन देत असल्याचे उघड होत आहे. भारताला अस्थिर करणे आणि काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्याच्या हेतूने पाकिस्तान दहशतवादी संघटनांना प्रोत्साहन देऊ शकतो. 

सुषमा स्वराज यांनी ती फी घेण्यासाठी हरिश साळवेंना घरी बोलावले होते आणि...

एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने 'हिंदुस्थान टाइम्स'ला सांगितले की, ज्यावेळी इम्रान खान यांनी वक्तव्य केले होते. त्यावेळी जैशचा प्रमुख दहशतवादी मौलाना मसूद अझहरचा छोटा भाऊ रौफ अजगर रावळपिंडीतील बैठकीनंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) गेला. 

भारत आणि पाकिस्तानच्या सीमारेषा परिसरात रौफ अजगर स्थलांतरित झाल्यानंतर पीओकेतील काश्मीरमधील पंजाब परिसरात मोठ्या संख्येने जैशच्या शिबिरातून दहशतवाद्यांची भरती केली जात आहे.