पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमित शहांचे कौतुक करताना मुकेश अंबानी काय म्हणाले माहितीये?

अमित शहा

गुजरातमधील पंडीत दिनदयाळ उपाध्याय पेट्रोलियम विद्यापीठाच्या पदवी प्रदान कार्यक्रमात रिलायन्स उद्योगसमुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे तोंडभरून कौतुक केले. या कार्यक्रमात मुकेश अंबानी म्हणाले, अमितभाई... तुम्ही खरंच कर्मयोगी आणि लोहपुरुष आहात. तुमच्यातील ऊर्जा आणि लक्ष्य साध्य करण्यासाठी लागणारा दृष्टिकोन यामुळे मी कायमच प्रभावित झालो आहे. तुमच्यासारखा नेता आधी गुजरात राज्यासाठी लाभणे आणि नंतर देशसेवेसाठी मिळणे हे  भाग्यच म्हटले पाहिजे.

राणेंचा 'महाराष्ट्र स्वाभिमानी'पक्ष भाजपमध्ये विलीन होणार

मुकेश अंबानी हे स्वतः या खासगी विद्यापीठाचे कुलपती आहेत. विद्यापीठाचा हा सातवा पदवी प्रदान समारंभ होता. यावेळी बोलताना अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, उरी आणि पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यांनंतर करण्यात आलेले हवाई हल्ले हे केवळ दहशतवाद्यांविरोधात होते. जे दहशतवादी भारतीय सीमेत घुसखोरी करून दहशत माजवितात. त्यांना रोखण्यासाठी हे हल्ले करण्यात आले होते. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या आणि या राज्याला देण्यात आलेला विशेष दर्जा रद्द करण्याच्या निर्णयाबद्दल त्यांनी नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले.

भाजप चोरांचा पक्ष होतोय का? प्रकाश आंबेडकरांचा खोचक सवाल

कलम ३७० रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच अमित शहा गुजरातमध्ये आले होते. यावेळी त्यांनी भारताची अर्थव्यवस्था आजही वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे सांगितले. त्याचबरोबर केवळ १२ वर्षांच्या काळात पंडीत दिनदयाळ उपाध्याय विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचे स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी मुकेश अंबानी यांचे कौतुक केले.