पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सलग १२ व्या वर्षी मुकेश अंबानी भारतातल्या श्रीमंतांच्या यादीत

रिलायन्स उद्योगसमुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी

फोर्ब्सनं भारतातल्या श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. या यादीत रिलायन्स उद्योगसमुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे पहिल्या स्थानी आहेत तर उद्योगपती गौतम अदानी हे दुसऱ्या स्थानी आहेत.  

तिसरा विरोधी पक्ष प्रॅक्टिकल विचारांचा, फडणवीसांचा 'मनसे' टोला

२०१९ या वर्षांत भारतातील या धनिकांच्या एकूण संपत्तीत जवळपास ८% पर्यंतची घट झाल्याचं निदर्शनास आलं आहे.  श्रीमंताच्या यादीत गेल्यावर्षी जे सहभागी होते त्यापैकी ९ श्रीमंतांची क्रमवारी घसरली आहे. या यादीतील जवळपास १४ धनिकांची संपत्ती १ बिलियन डॉलरनं कमी झाली असल्याचं फोर्ब्सनं म्हटलं आहे. 

वाहन उद्योगाचे बुरे दिन अद्याप कायम, विक्रीचा आलेख खालच्या दिशेने

फोर्ब्सच्या  श्रीमंतांच्या यादीत गेल्या १२ वर्षांपासून मुकेश अंबानी हे आपलं स्थान टिकवून आहेत.  श्रीमंताच्या यादीत पहिल्या स्थानावर असलेल्या मुकेश अंबानी  यांची संपत्ती ५१.४ बिलियन डॉलर इतकी आहे. अशोक लेलँडचे मालक असलेले हिंदुजा ब्रदर्स हे तिसऱ्या स्थानी, शाहपूरजी पलोनजी ग्रुपचे पलोनजी मिस्त्री हे चौथ्या स्थानी, कोटक महिंद्रा बँकेचे उदय कोटक हे पाचव्या स्थानी आहेत. एचसीएल समुहाचे अध्यक्ष शिव नडार हे सहाव्या स्थानी आहेत. 

जिओच्या प्लॅनमध्ये मोठा बदल, यापुढे फोन लावला तरी पैसे द्यावे लागणार

 यंदाच्या फोर्ब्सच्या धनिकांच्या यादीत सहा नव्या चेहऱ्यांचाही समावेश आहे.