पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हेमामालिनीच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते करू, मंत्री बरळले

मध्य प्रदेशमधील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. (प्रातिनिधिक छायाचित्र)

आपण काय बोलतोय, याचे भान अनेकवेळा राजकीय नेत्यांना राहात नाही. बोलण्याच्या ओघात एखादे चुकीचे वक्तव्य केल्यानंतर मग आपल्या बोलण्यामुळे काय झालंय, हे या नेत्यांना कळते. मध्य प्रदेशमधील कॅबिनेट दर्जाचे मंत्री पी सी शर्मा यांनी एक असेच वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनीच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते करून देतो, असे आश्वासन त्यांनी मध्य प्रदेशमधील लोकांना दिले. भोपाळमधील हबीबगंज भागात रस्त्यांची पाहणी करीत असताना त्यांनी हे वक्तव्य केले. 

मूळ मुद्द्यांपासून लक्ष हटविण्यासाठी भाजपकडून कलम ३७०चा वापर - पवार

पत्रकारांशी बोलताना शर्मा म्हणाले, मध्य प्रदेशमधील रस्ते वॉशिंग्टनमधील रस्त्यांच्या दर्जासारखे बांधल्याचे मी ऐकले होते. पण त्या रस्त्यांचे आता काय झाले आहे? पावसानंतर सगळीकडे खड्डे पडले आहेत. सध्या रस्त्यांची अवस्था कैलाश विजयवर्गीय यांच्या गालासारखी झाली आहे. आता मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या आदेशानंतर १५ दिवसांत सगळ्या रस्त्यांची कामे केली जातील. लवकरच इथले रस्ते हेमामालिनी यांच्या गालासारखे करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

रामजन्मभूमी प्रकरणी सुनावणीचा आज अंतिम दिवस, काय होणार कोर्टात?

मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते गोपाळ भार्गव यांनी गेल्याच आठवड्यात मध्य प्रदेशमधील रस्त्याच्या स्थितीवरून कमलनाथ सरकारवर टीका केली होती. त्यानंतर रस्त्यांची पाहणी केल्यावर शर्मा यांनी हे वक्तव्य केले. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ऑक्टोबर २०१७ मध्ये एक वक्तव्य केले होते. त्यावेळी त्यांनी मध्य प्रदेशमधील रस्ते अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा जास्त चांगले असल्याचे म्हटले होते. त्यावेळी त्यांच्यावर यावरून टीका झाली होती. त्याचाच धागा पकडून शर्मा यांनी वॉशिंग्टनमधील रस्त्यांचा उल्लेख केला.