पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

MPमध्ये राजकीय पेच: भाजपने ८ आमदारांना बळजबरीने हॉटेलवर ठेवले, काँग्रेसचा आरोप

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ

मध्य प्रदेशच्या राजकारणात राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. हरियाणाच्या हॉटेलमध्ये भाजपने आपल्या ८ आमदारांना बळजबरीने ठेवले असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मध्य प्रदेश सरकारचे मंत्री जीतू पटवारी यांनी सांगितले की, 'मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, माजी मंत्री नरोत्तम मिश्रा, भूपेंद्र सिंह आणि रामपाल सिंह यांच्यासह अन्य भाजपा नेत्यांनी षडयंत्र करत बळजबरीने काँग्रेसच्या ८ आमदारांना हरियाणाच्या एका हॉटेलमध्ये घेऊन गेले.'

बंगालमध्ये राहणारे सर्व बांगलादेशी भारतीय नागरिक: ममता बॅनर्जी

जीतू पटवारी यांनी पुढे असे सांगितले की, 'आमदारांनी आम्हाला सांगितले की त्यांना भाजप नेत्यांनी बळजबरीने ठेवले होते. तसंच आम्ही आमदारांना परत आणण्याचा प्रयत्न करीत आहोत असे पटवारी यांनी सांगितले. त्यामधील चार आमदार परत आले आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सांगितले की, परिस्थिती नियंत्रणात आहे. आमदार परत येतील. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणाला घेऊन गेलेल्या ८ आमदारांपैकी चार आमदार काँग्रेसचे आहेत, एक अपक्ष तर बाकीचे बसपा आणि सपाचे आमदार आहेत.

दिल्ली: कोरोनाच्या २४ संशयित रुग्णांना ITBP कॅम्पवर हलवले

राज्यातील राजकीय पेचप्रसंगानंतर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी सांगितले की, 'भाजपचे रामपाल सिंह, नरोत्तम मिश्रा, अरविंद भदोरिया, संजय पाठक हॉटेलमध्ये ठेवलेल्या आमदारांना पैसे देण्यासाठी जात होते. जर छापा पडला असता तर ते पकडले गेले असते. आम्हाला असे वाटते की १० ते ११ आमदार त्याठिकाणी होते. आता त्यांच्याकडे फक्त ४ आमदार आहेत. ते सुध्दा आमच्याकडे परत येतील.', असा विश्वास दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केला आहे. 

जयपूरमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण; भारतात रुग्णांची संख्या ६ वर

दिग्विजय सिंह यांनी पुढे सांगितले की, 'ज्या आमदारांशी आम्ही संपर्क साधत होतो ते आमच्याकडे परत येण्यास तयार होते. बिसाहूलाल आणि रमाबाई आमच्या संपर्कात होते. रमाबाई परत आल्या आहेत. त्यांना सुध्दा भाजपने थांबवण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, भाजप मध्य प्रदेश सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी सोमवारी केला होता. तसंच भाजप काँग्रेसच्या आमदारांना पैसे देण्याचा प्रयत्न करत आहे असा देखील आरोप त्यांनी केला होता. 

'तारक मेहता'मधील भाषा वाद अन् नंतर निर्मात्याचं स्पष्टीकरण