ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकार संकटात सापडले आहे. १९ आमदारांच्या राजीनाम्याचा आकडा आता २२ वर पोहचला असून भाजप आपला डाव यशस्वी करण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, भाजपचे नेते भेपेंद्रसिंह हुड्डा बंगळुरुमधील १९ आमदारांचे राजीनामे घेऊन भोपाळमध्ये पोहचले आहेत. राजीनाम्याचा आकडा हा ३० पर्यंत पोहचेल असे त्यांनी सांगितले असून अनेकजण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
MP: बसपा-सपा आमदारही भाजपच्या गळाला?, तरीही काँग्रेसला सरकारवर भरवसा
ज्या सहा मंत्र्यांनी राजीनामा दिलाय त्यांना बरखास्त करावे, अशी मागणी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यपाल लालजी टंडन यांच्याकडे केली असून यासंदर्भात राज्यपालांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे रविवारी कमलनाथ यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही देणाऱ्या मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि आमदार बिसाहूलाल सिंह यांनी शिवराज सिंह यांच्या उपस्थितीत आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा करत भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यांच्याशिवाय देवास जिल्ह्यातील हाट पिपल्या विधानसभेचे काँग्रेसचे आमदार मनोज चौधरी आणि एंदल सिंह कंशाना यांनी देखील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या नेत्यांसह राजीनामा देणाऱ्यांचा आकडा हा २२ वर पोहचला आहे.
Bhupendra Singh,BJP: I have come to Bhopal with the resignations of 19 MLAs who are currently in Bengaluru. The number can increase till 30 by evening as many people are willing to join BJP. #MadhyaPradesh pic.twitter.com/0joNeJoFRf
— ANI (@ANI) March 10, 2020
शिंदे गटाच्या मंत्र्यांना बरखास्त करा, CM कमलनाथांचे
मध्य प्रदेशमध्ये एकूण २३० संख्याबळ असलेल्या विधानसभेत सध्या २२८ पैकी काँग्रेसचे ११४ आमदार होते. तर भाजपच्या आमदारांचे संख्याबळ हे १०७ होते. बसपाचे २, सपा १ आणि ४ अपक्ष आमदारांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. २२ आमदारांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या संख्याबळाचा आकडा हा ९२ वर आला आहे. यात बसपा, सपा आणि अपक्ष या ७ आमदारांनी जरी काँग्रेसला समर्थन दिले तरी त्यांचे संख्याबळ हे ९९ पर्यंतच पोहचेल. दुसरीकडे भाजपचा १०७ आकडा काँग्रेससमोर भारी ठरेल. २२ आमदारांचे राजीनामे स्वीकारल्यानंतर विधानसभेची संख्या ही २०६ होईल आणि बहुमतासाठी १०४ संख्याबळाची आवश्यकता असेल. यापरिस्थितीत बहुमत हे भाजपच्या पारड्यात असेल. १६ मार्चपासून मध्य प्रेदश विधानसभा सत्र सुरु होईल. यावेळी भाजपने अविश्वस प्रस्ताव आणल्यास कमलनाथ सरकार पडण्याची शक्यता आहे.