पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

MP: बसपा-सपा आमदारही भाजपच्या गळाला?, तरीही काँग्रेसला सरकारवर भरवसा

मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारच्या अडचणी आणखी वाढल्या

मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकार कोसळून राज्यात कमळ फुलण्याचे संकेत दिसू लागले आहेत. काँग्रेसचा हुकमी एक्का असलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाला रामराम केल्यानंतर १९ आमदारांनी राजीनामा दिला. त्यानंतर मध्य प्रदेशमधील राजकीय घडामोडींसंदर्भात भाजपच्या गोटातील हालचाली वाढल्या आहेत. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या आमदारांनी भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री पदाचा प्रमुख चेहरा असलेल्या शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली आहे. 

शिंदे गटाच्या मत्र्यांना बरखास्त करा, CM कमलनाथांचे राज्यपालांना पत्र

राजेश शुक्ला आणि संजीव कुशवाहा यांच्या भेटीनंतर मध्य प्रदेशमध्ये 'ऑपरेशन लोटस' सुरु असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळत आहे. भाजपने याठिकाणी सरकार स्थापन करण्याचा दावा केला तर या दोन आमदारांचे त्यांना समर्थन मिळेल, असेच चित्र या भेटीनंतर निर्माण झाले आहे. शिवराज सिंह यांनी मात्र ही भेट राजकीय नसल्याचे सांगत सध्याच्या घडीला आम्ही केवळ मध्य प्रदेशमधील राज्यसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीची रणनिती आखत असल्याचे म्हटले आहे. 

ज्योतिरादित्य शिंदे आजच भाजपत प्रवेश करण्याची शक्यता

दुसरीकडे कर्नाटकमध्ये वास्तव्यास असलेल्या ६ मंत्र्यांसह १९ आमदारांनी मध्य प्रदेश पोलिसांना सुरक्षेची मागणी केल्याचे वृत्त आहे. आम्ही काही महत्त्वपूर्ण कामासाठी भोपाळमध्ये येणार आहोत. त्यासाठी आम्हाला सुरक्षेची आवश्यकता आहे, असे त्यांनी म्हटले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर १९ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप प्रवेशाचा सिलसिलाही सुरु झाल्याचे समजते.

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या १९ आमदारांचे राजीनामे

त्यानंतरही मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकार स्थिर राहिल असा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे. काँग्रेस नेते कांतिलाल भूरिया यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. आमच्याकडे आवश्यक संख्याबळ असून कमलनाथ सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावा कांतिलाल भूरिया यांनी केला आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:MP Crisis SP MLA Rajesh Shukla and BSP MLA Sanjeev Kushwaha meets BJP leader Shivraj Singh Chouhan