पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ज्योतिरादित्य शिंदेंनी घेतली नरेंद्र मोदींची भेट

ज्योतिरादित्य सिंधिया

मध्य प्रदेशमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा त्यांच्यासोबत होते. सुमारे तासभर या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून जाऊ नये, यासाठीही प्रयत्न केले जात असल्याची माहिती मिळाली आहे. 

इटलीतून आलेल्यांमुळेच भारतात कोरोनाचा मोठा फैलाव

ज्योतिरादित्य शिंदे आपला निर्णय आजच जाहिर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांचे वडील माधवराव शिंदे यांची आज जयंती आहे. त्यामुळे याच दिवसाचे औचित्य साधून ते मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ते मंगळवारीच ग्वाल्हेरला जाण्याचीही शक्यता आहे. 

''मध्य प्रदेशात सरकार पाडण्यात अजिबात रस नाही''

दुसरीकडे राजस्थानमधील उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मध्य प्रदेशमध्ये निर्माण झालेला राजकीय पेच लवकरच संपेल, अशी मला आशा आहे. लोकांना निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी मध्य प्रदेशमध्ये स्थिर सरकारची गरज आहे.